The body of a person
बीड महाराष्ट्र

मित्राच्या लग्नात बेधुंद होऊन नाचताना घडला अनर्थ, तरुणाचा मृत्यू

बीड : मित्राच्या लग्नातील मिरवणुकीत नाचणाऱ्या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. वैभव रामभाऊ राऊत (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे. बीड जिल्ह्यातील शिंदेवाडी गावात रविवारी रात्री ही घटना घडली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी शिंदेवाडी गावात विवाहाचे आयोजन करण्यात आले होते. या लग्नात वधू-वर दोघेही शिंदेवाडी गावचे रहिवासी होते. नवरदेव अक्षय माने याच्या लग्नासाठी त्याचे माजलगाव येथील मित्रही उपस्थित होते. त्यात वैभव राऊतही आलेला होता. दरम्यान, सायंकाळी साडेसहाच्या सुमारास लग्नापूर्वी नवरदेवाची मिरवणूक काढण्यात आली. त्यावेळी सर्व तरुण मिरवणुकीत बेधुंद नाचत होते.

काहीवेळाने मिरवणूक लग्नस्थळी पोहोचली, यावेळी नाचून नाचून थकलेल्या वैभव राऊतने तहान लागल्यामुळे मित्रांसोबत खुर्चीवर बसून भरपूर पाणी प्यायले. त्यानंतर अचानक त्याला अस्वथ वाटू लागले आणि काही क्षणांतच त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्याला तात्काळ माजलगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत