IPL 2022 : आयपीएल सुरू होण्यापूर्वी दिग्गज यष्टिरक्षक-फलंदाज महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपर किंग्जचे (CSK) कर्णधारपद सोडले आहे. त्याने संघाचे नेतृत्व अष्टपैलू रवींद्र जडेजाकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.
2012 पासून चेन्नई सुपर किंग्जचा अविभाज्य भाग असलेला जडेजा सीएसकेचे नेतृत्व करणारा फक्त तिसरा खेळाडू असेल. धोनी या मोसमात आणि त्यानंतरही चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधित्व करत राहील.
? Official Statement ?#WhistlePodu #Yellove ?? @msdhoni @imjadeja
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 24, 2022




