कोल्हापूर : एका टीव्ही अभिनेत्याला विनयभंगाच्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी अटक केली आहे. जितेंद्र शेलाजी पोळ (वय ३२) असे अटक केलेल्या कलाकाराचे नाव आहे. त्याने पोलिसांना सांगितले की ‘गजानन महाराज शेगाव’ या मालिकेत त्याने भूमिका केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र पोळ याची शादी डॉट कॉम या वेबसाईटच्या माध्यमातून एका महिलेशी ओळख झाली. ओळख झाल्यानंतर त्यानं संबंधित महिलेशी लग्नाचा प्रस्ताव ठेवला. पण त्या महिलेने लग्नाला नकार दिला. मात्र, त्यानंतरही ती काम करत असलेल्या ठिकाणी वेळोवेळी जाऊन, पाठलाग करून तिला अडवून लगट करण्याचा प्रयत्न जितेंद्रने केला. तसेच लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केला. या गुन्ह्याखाली पोळ याला राजारामपुरी पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.




