इराण : अनैतिक संबंधांच्या संशयातून एका व्यक्तीने आपल्या पत्नीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे, आपल्या पत्नीचं धडावेगळं केलेलं शीर हातात घेऊन ही व्यक्ती रस्त्यावर फिरत होती. काही कॅमेऱ्यांनी हे भयंकर कृत्य टिपलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. इराणमधून ही अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे.
पत्नीचं शीर हातात घेतलेल्या या व्यक्तीचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्यक्तीच्या दुसऱ्या हातात चाकू होता. मृत महिलेचं नाव मोना हैदरी आहे. इराणची वृत्तसंस्था ‘आयआरएनए’ने दिलेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय मोना हैदरीची हत्या तिचा पती आणि दीराने केली. दक्षिण पश्चिम शहर अहवाज मध्ये ही घटना घडली. घटनेनंतर दोन्ही आरोपी लपून बसले होते. या घटनेची माहिती मिळताच सोमवारी पोलिसांनी मुख्य आरोपीसह दोघांना अटक केली.
इराणमध्ये विवाहासाठी मुलींचं वय कमीत कमी १३ वर्ष असावं, असं कायदेशीररित्या निश्चित करण्यात आलेलं आहे. ही घटना समोर आल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी इराणमध्ये सामाजिक आणि कायदेशीर सुधारणेची आवश्यकता असल्याचं म्हटलं आहे.




