कोलकाता : बिकानेर-गुवाहाटी एक्स्प्रेस डोमोहनीजवळ रुळावरून घसरली. बिकानेर गुवाहाटी एक्सप्रेस बंगालच्या उत्तर भागात मैनागुरीजवळ डोमोहनीजवळ रुळावरून घसरली आहे. ही ट्रेन पटनाहून गुवाहाटीला जात होती. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाल्याची भीती असून सध्या बचाव आणि मदतकार्य सुरू आहे.
मेनागुरीजवळ सायंकाळी ५.०५ वाजता हा अपघात झाला. या अपघातात चार डबे रुळावरून घसरल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाल्याचं सांगण्यात येत असून मृत्यू झाल्याची शक्यताही वर्तवली जात आहे. हे क्षेत्र उत्तर पूर्व हद्दीत येते. अपघाताची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले असून परिस्थितीची माहिती घेतली जात आहे. जवळपासच्या हॉस्पिटलमध्ये व्यवस्था करण्यात येत आहे. स्थानिक लोक जखमींना रेल्वेच्या बोगीतून बाहेर काढत आहेत.
Disturbing Visuals
Guwahati-Bikaner Express derailed near Domohani, West Bengal. Rescue operations are underway. pic.twitter.com/Dh8oPVpsWL
— Abhiram Basava (@Abhiram_basava) January 13, 2022




