130 year old time capsule found in base of the gen robert lee statue
ग्लोबल

पुतळ्याच्या तळाशी सापडली 130 वर्षे जुनी टाइम कॅप्सूल

वॉशिंग्टन : अमेरिकेतील व्हर्जिनिया येथे कामगारांना सोमवारी एक तांब्याचा बॉक्स सापडला. हा बॉक्स 130 वर्षांपूर्वी पुरण्यात आला होता. कॉन्फेडरेट जनरलच्या पुतळ्याच्या पायाच्या खोदकामात हा बॉक्स सापडला. 13.5 इंच बाय 13.5 इंच बाय 7.5 इंच असलेल्या या तांब्याच्या पेटीचे वजन 36 पौंड आहे, असे अहवालात नमूद केले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

व्हर्जिनियाचे गव्हर्नर राल्फ नॉर्थम यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर व्हर्जिनियाच्या रिचमंड शहरात सापडलेल्या या बॉक्सचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यांनी ट्विट केले की, “कदाचित हे तेच टाइम कॅप्सूल आहे, ज्याचा सर्वजण शोध घेत होते.” नॉर्थम म्हणाले की, संरक्षक अगोदर त्याचा अभ्यास करतील, सोमवारी ते उघडले जाणार नाही.

1887 च्या वृत्तपत्रातील लेखानुसार, गृहयुद्धादरम्यान नॉर्दर्न व्हर्जिनियाच्या सैन्याचे नेतृत्व करणारे जनरल रॉबर्ट ई ली यांच्या पुतळ्याच्या तळाशी टाइम कॅप्सूलमध्ये बटणे आणि बुलेट्स, कॉन्फेडरेट चलन, नकाशे आणि राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचे दुर्मिळ चित्र आणि इतर वस्तू आहेत.

मागील आठवड्यात पुतळ्याच्या पायथ्याशी या बॉक्सच्या निम्म्या आकाराचा बॉक्स सापडला होता, ज्यात तीन पाणी साचलेली पुस्तके, ओलसर कापडाच्या पाकिटातील एक छायाचित्र आणि एक नाणे होते. पुतळा उभारणाऱ्या काही कामगारांनी या वस्तू वंशजांसाठी मागे ठेवलेल्या स्मृतिचिन्हासारख्या असल्याचं दिसून येत होतं.

सोमवारी सापडलेल्या टाइम कॅप्सूलचा आकार दुप्पट आहे. कॅप्सूल जनरल रॉबर्ट ई ली यांच्या कांस्य अश्वारूढ पुतळ्याखाली होती. ही मूर्ती १८९० मध्ये तयार करण्यात आली होती. या स्मारकाकडे वांशिक अन्यायाचे प्रतीक म्हणून पाहिले जात होते. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात ते काढून टाकण्यात आले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत