तुम्हाला मनापासून हवी असलेली एखादी गोष्ट मिळते, तेव्हा तुम्हाला कसे वाटते? तो आनंद शब्दांत सांगता येत नाही, बरोबर ना? असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका लहान मुलाला त्याचा कृत्रिम हात बसवण्यात आला. त्यानंतर त्याच्या हृदयस्पर्शी प्रतिक्रियेतून त्याला झालेला आनंद दिसून येत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, एक लहान मुलगा व्हीलचेअरवर बसलेला दिसत आहे. त्याने त्याचा कापलेला हात पुढे धरला आहे, त्यानंतर डॉक्टरांनी त्याचा कृत्रिम हात जोडला. संपूर्ण प्रक्रिया सुरु असताना तो शांतपणे बसलेला आहे आणि बारकाईने निरीक्षण करत आहे.
The happiness on this kids face when he gets his first Prosthetic Arm ❤️ pic.twitter.com/ASKk1E5l3e
— Amazing Posts (@AmazingPosts_) November 30, 2021
या सम्पूर्ण प्रक्रियेनंतर या मुलाने दिलेले स्मितहास्य बघून त्याला झालेला आनंद दिसून येत आहे. Amazing Posts नावाच्या अकाऊंटने हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. नेटिझन्स या मुलाच्या गोड हास्याच्या प्रेमात पडले आहेत.




