पुणे : जर तुम्ही तुमची कार विकणार असाल, किंवा विकण्याचा विचार करत असाल, तर त्यामुळे त्यावर इन्स्टॉल केलेल्या FASTag चे काय होईल? हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी सर्वप्रथम टॅग देणाऱ्या बँकेला कळवावे लागेल. ते FASTag खाते बंद करावे लागेल. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानेही आपल्या अधिकृत वेबसाइटवर ही माहिती दिली आहे. तुम्ही जर विचार करत असाल की आम्ही गाडी विकली तर फास्टॅगने काय होईल? पण तसे नाही, FASTag डिऍक्टिव्हेट न केल्यास खूप नुकसान होऊ शकते.
जर तुम्ही तुमची कार विकली असेल तर FASTag लवकर बंद करायला हवे. तसे न केल्यास तुमच्या त्याच खात्यातून टोल भुगतान होत राहील. म्हणजेच गाडी दुसऱ्याची होईल पण पैसे तुमच्या खात्यातून जातील. दुसरीकडे, जर FASTag खाते लिंक असेल, तर नवीन कार मालक देखील नवीन FASTag साठी अर्ज करू शकत नाही. वाहनावर फक्त एकच फास्टॅग लिंक असते.
फास्टॅग खाते कसे बंद करावे?
FASTag लिंक केलेली खाती किंवा ई-वॉलेट बंद करण्यासाठी सेवा प्रदात्यांच्या (Service providers) प्रक्रिया वेगवेगळ्या असतात. परंतु सर्वात सोपा मार्ग म्हणजे FASTag प्रदात्याच्या ग्राहक सेवाशी (customer care) संपर्क साधणे. तुम्ही खाली दिलेल्या काही स्टेप्स देखील फॉलो करू शकता.
- FASTag खाते बंद करण्यासाठी कस्टमर केयर सेवेला कॉल करा.
- FASTag शी संबंधित उपायांसाठी, तुम्ही हेल्पलाइन नंबर 1033 वर कॉल करू शकता.
- FASTag शी लिंक केलेले मोबाईल अॅप वापरा.
- FASTag जारी करणार्या अॅप किंवा प्रीपेड वॉलेटमध्ये लॉग इन करा.
- आता FASTag खाते बंद करण्याच्या स्टेप्स फॉलो करा.
- तुम्ही FASTag जारी करणार्या बँकेच्या पोर्टलवर जाऊन देखील FASTANG बंद करू शकता.




