बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची प्रकृती खालावत आहे. त्यांच्यावर उपचार करणार्या डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली असून संबंधित विभागांना त्याबद्दल कळविले आहे. लालू प्रसाद यादव रांची येथील राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (रिम्स) येथे उपचार घेत आहेत. त्यांचे फक्त 25 टक्के मूत्रपिंड कार्यरत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
लालूंवर उपचार करत असलेले रिम्सचे डॉक्टर म्हणाले कि, ‘लालू प्रसाद यादव यांच्या मूत्रपिंडाचे कार्य कधीही बिघडू शकते. हे अतिशय धोकादायक असून मी ते अधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात सांगितलं आहे.’