ब्राझील : ट्विटरवर एक भयंकर व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात तलावामध्ये मगर एका माणसाचा पाठलाग करून त्याच्यावर हल्ला करताना दिसत आहे. ही घटना शनिवारी ब्राझीलमधील कॅम्पो ग्रांडे येथील लागो डो आमोर येथे घडली. हा तलाव पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे, परंतु त्यामध्ये मगरी असल्याने तो पोहणाऱ्यांसाठी प्रतिबंधित आहे. परंतु, या व्हिडिओमधील व्यक्तीने चेतावणीच्या चिन्हांकडे दुर्लक्ष केले आणि तलावामध्ये पोहण्याचा निर्णय घेतला.
विल्यन केटानो (Willyan Caetano), ज्याने ही घटना आपल्या मोबाईल फोनवर कॅप्चर केली, त्याने संध्याकाळी 4.40 च्या सुमारास त्या व्यक्तीला प्रतिबंधित तलावात प्रवेश करताना पाहिले. त्यानंतर थोड्याच वेळात एक मगर वेगाने पाण्यातून त्याच्या दिशेने येऊ लागली. मगरीने त्याच्यावर हल्ला केला, परंतु तो शक्य तितक्या लवकर स्वतःची सुटका करून किनाऱ्यावर पोहोचला.
व्हिडिओ चित्रित करणार्या केटानो यांनी सांगितले कि, “अचानक एक मगर त्या व्यक्तीचा पाठलाग करू लागली. त्याने निसटण्याची वेगाने पोहण्याचा प्रयत्न केला, परंतु मगर त्याच्यापर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाली आणि त्या माणसाच्या हातावर हिंसक चावा घेतला, तो रक्तबंबाळ झाला होता आणि खूप घाबरलेल्या अवस्थेत पाण्यातून बाहेर आला, तो म्हणाला की त्याला तेथे मगर असल्याचं माहित नव्हतं.
O CARA NADANDO NO LAGO DO AMOR E NÃO SABIA QUE TEM JACARÉ LÁ, tomou uma mordida só de leve pq o jacaré foi bonzinho pic.twitter.com/eUtWZy83wp
— perdidinha da silva (@ayora_003) October 23, 2021
स्थानिक वृत्तानुसार, हल्ल्यानंतर स्थानिक लोक जखमी व्यक्तीभोवती जमा झाले आणि मोबाईल इमर्जन्सी केअर सर्व्हिसला कॉल केला. त्याच्या एका हाताला किरकोळ दुखापत झाली होती आणि तो सुरक्षित होता. प्रत्यक्षदर्शी गारापेरा मारिनाल्वा दा सिल्वा गेल्या पाच वर्षांपासून लागो डो आमोर येथे उसाचा रस विकते, ती म्हणाली की तिने पाच वर्षांत प्रथमच एखाद्या व्यक्तीला पाण्यात जाताना पाहिले आहे. तिने सांगितले कि, “कधीकधी, मुले तिथे जातात, परंतु आम्ही त्यांना सांगतो की तेथे एक मगर आहे आणि ते पाणी खराब आहे, त्यामुळे ते मागे येतात.”




