मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अनिल देशमुख यांच्याविरुद्ध लूकआऊट नोटीस बजावली आहे. १०० कोटी रुपये खंडणी प्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. लूकआऊट नोटीसनुसार अनिल देशमुख यांना देशभरातून शोधून काढण्याचे अधिकार मिळाले आहेत. देशमुख यांना आता देश सोडून जाता येणार नाही.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी आरोप केला होता की अनिल देशमुख यांनी गृहमंत्री असताना दरमहा १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचे टार्गेट दिले होते. या पार्श्वभूमीवर सीबीआय आणि ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. ईडीने पाच वेळा देशमुख यांना चौकशीचे समन्स बजावले. मात्र दरवेळी देशमुख गैरहजर राहिले. त्यानंतर आता त्यांनी देश सोडून जाऊ नये यासाठी लूकआऊट नोटीस बजावण्यात आली आहे.
ईडीची तीन पथके एकाचवेळी संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा शोध घेत आहेत. ईडीने विविध ठिकाणांवर छापे देखील टाकले आहेत. आता लूकआऊट नोटीसनुसार अनिल देशमुख यांना देशभरातून शोधून काढण्याचे अधिकार मिळाले आहेत. देशभरातील विमानतळांना देखील नोटीस गेली आहे. त्यामुळे देशमुख देश सोडून जाऊ शकणार नाहीत.
ईडीच्या सूत्रांनी सांगितले की, एजन्सीकडे अनिल देशमुख यांच्या विरोधात पुरेसे पुरावे आहेत आणि त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु आहे.




