नवी दिल्ली : WhatsApp ने युजर्सच्या आरोग्याच्या दृष्टीने कोरोना लसीकरणाशी संबंधित नवीन सेवा सुरु केली आहे. आता तुम्ही WhatsApp च्या मदतीने Covid-19 Vaccination स्लॉट बुक करू शकणार आहात. व्हॉट्सअॅपने मंगळवारी सांगितले की, मायगव्ह कोरोना हेल्पडेस्क वापरून युजर्स आता त्यांचे जवळचे लसीकरण केंद्र शोधू शकतील आणि Vaccination स्लॉट देखील बुक करू शकतील.
५ ऑगस्ट रोजी मायगव्ह आणि व्हॉट्सअॅपने युजर्ससाठी चॅटबॉट वरून लस प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी सेवा सुरू केली आणि आतापर्यंत देशभरातील ३२ लाख युजर्सने लस प्रमाणपत्र डाउनलोड केले आहे. व्हॉट्सअॅपने गेल्या वर्षी चॅटबॉक्सच्या माध्यमातून कोरोनाविषयी पसरलेली चुकीची माहिती काढून टाकण्याचा प्रयत्न सुरू केला.
अशाप्रकारे बुक करा WhatsApp वर Vaccination स्लॉट :
- सर्वप्रथम, MyGov कोरोना हेल्पडेस्क चॅटबॉटशी संपर्क साधण्यासाठी, तुमच्या फोनवर +९१ ९०१३१२५१५१५ हा नंबर सेव्ह करा.
- बुक स्लॉट टाइप करून सेव्ह केलेल्या नंबरवर पाठवा.
- यानंतर तुमच्या मोबाइल फोन क्रमांकावर सहा अंकी वन-टाइम पासवर्ड तयार होईल. आता तुम्हाला पिनकोड आणि लसीच्या प्रकारावर आधारित पसंतीची तारीख आणि स्थान निवडावे लागेल.
- तारीख आणि स्थान निवडल्यानंतर, तुम्हाला तुमच्या जवळच्या केंद्राचे पर्याय मिळतील, तुमच्या आवडीचे लसीकरण नियुक्ती केंद्र निवडा आणि अगदी सहजपणे स्लॉट बुक करा.




