कोल्हापूर : स्वतःच्या ५ वर्षीय नातीवर बलात्कार करणाऱ्या नराधम आजोबाला २० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस. एम. चंदगडे यांनी आरोपी नामदेव जाधव (वय ६५) याला २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. बलात्कार व बाल लैगिंक अत्याचार प्रतिबंधक कलमानुसार ही सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे आई-वडील २० डिसेंबर २०१८ रोजी सकाळी १० च्या सुमारास ऊस तोडणीसाठी गेले होते. तर त्यांची तीन लहान मुले आजोबांबरोबर घरीच होती. आरोपीने चिमुकल्या नातीवर रात्री ८ च्या सुमारास बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी चिमुकलीने तिला त्रास होत असल्याची माहिती आईला दिली. त्यानंतर तिचे आई-वडील तिला दवाखान्यात घेऊन गेले. डॉक्टरांनी पूर्ण तपासणी करून मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती दिली.
अभिनेता प्राचीन चौहानला तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक
कोल्हापूर येथील वैद्यकीय तपासणीत बलात्कार झाल्याची पुष्टी झाली. त्यानंतर याबाबत कोडोली पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवण्यात आली होती. पीडित मुलीच्या वडिलांनी याबाबत विचारणा केली, तेव्हा आजोबांनीच नातीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी कोर्टात एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी फिर्यादी, वडील, पीडित मुलगी, मुलीची आई, पंच, मेडिकल ऑफिसर व तपास अंमलदार यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. न्यायमूर्ती चंदगडे यांनी बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कलमानुसार आरोपीस २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.
एका पुरुषाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये फ्रॅक्चर, अशाप्रकारची पहिलीच केस बघून डॉक्टरही आश्चर्यचकित




