उत्तराखंड : ज्वालापूर विधानसभा मतदार संघाचे भाजप आमदार सुरेश राठौर यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पक्षातील माजी सहकारी कार्यकर्त्या महिलेनेच राठौर यांच्याविरोधात ही तक्रार दाखल केली आहे. आमदार सुरेश राठौर यांनी हे आरोप पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे.
पोलिसांनी सुरेश राठौर यांच्याविरोधात कलम 156(3), 376, 504, 506 अशा अनेक कलमान्वये गुन्हा दाखल करून घेतला आहे. हरिद्वारचे वरिष्ठ पोलिस आधिकारी अबुदई कृष्णराज यांनी या प्रकरणाचा तपास पोलिस करत असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, आमदार सुरेश राठौर यांनी आपल्यावरील सर्व फेटाळू लावले असून त्यांच्या जिवाला धोका असल्याचेही सांगितले आहे.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी सुरेश राठौर यांनी याच महिला कार्यकर्त्याच्या पतीविरोधात 30 लाख रुपयांच्या खंडणीचा आरोप केला होता आणि याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. महेश नेगी यांच्यानंतर राठोड हे उत्तराखंडमधील दुसरे आमदार आहेत, ज्यांच्यावर असे गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. राठोड यांच्यावर फिर्यादीने बलात्कार आणि धमकावल्याचा आरोप केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.




