नवी दिल्ली : Zebronics ZEB-FIT4220CH स्मार्टवॉच भारतात लॉन्च करण्यात आले आहे. या स्मार्टवॉचमध्ये कॉलिंग फीचर उपलब्ध असून, वॉचद्वारे थेट फोन करता येईल आणि कॉलला उत्तर देखील देता येईल. या वॉचमध्ये ब्लड प्रेशर मॉनिटर देखील मिळतो. भारतात या स्मार्टवॉचची किंमत ३,१९९ रुपये असून, हे वॉच Amazon India वरून खरेदी करता येईल. हे स्मार्टवॉच ब्लॅक विद मॅचिंग स्ट्रॅप, कॅडेट ग्रे विद मॅचिंग स्ट्रॅप आणि सिल्वर विद व्हाइट स्ट्रॅप अशा तीन प्रकारात येते.
Zebronics ZEB-FIT4220CH स्मार्टवॉचचे फीचर्स :
- या स्मार्टवॉचमध्ये १.२9 इंच फुल कॅपेसिटिव्ह टच TFT कलर डिस्प्ले देण्यात आला आहे.
- या वॉचमध्ये कॉलिंग फीचरसाठी बिल्ट-इन माइक आणि स्पिकर देण्यात आला आहे. कॉल रिजेक्ट करण्याचे फीचर देखील यात मिळते. सोबतच, यूजर्सला या वॉचमध्ये रिसेंट कॉल्स, कॉन्टॅक्ट्स आणि डायल पॅडचा देखील अॅक्सेस मिळेल. यूजर्स हे वॉच ब्लूटूथद्वारे स्मार्टफोनला कनेक्ट करून थेट वॉचवरूनच कॉल करू शकतात.
- Zebronics ZEB-FIT4220CH Zeb Fit20 अॅपद्वारे अँड्राइड आणि iOS दोन्हीसोबत कनेक्ट करता येईल.
- यात २२० mAh बॅटरी मिळते.
- Zebronics ZEB-FIT4220CH वॉच सात स्पोर्ट्स मोड्स सोबत येते. यात वॉकिंग, रनिंग, स्किपिंग, सायकलिंग, फुटबॉल, बास्केटबॉल आणि बॅडमिंटनचा समावेश आहे.
- हे स्मार्टवॉच ब्लड प्रेशर, हार्ट रेट आणि SpO2 मॉनिटर करू शकते. तसेच, स्लीप, स्टेप्स, कॅलरी आणि डिस्टेंस देखील ट्रॅक करू शकते.
- Zebronics च्या या वॉचमध्ये १०० पेक्षा अधिक कस्टमाइजेबल वॉच फेस देण्यात आले आहे.
- हे वॉच डस्ट आणि वॉटर रेसिस्टेंससाठी IP६७ सर्टिफाइड आहे.
- यात ३० दिवसांचा स्टँडबाय टाइम मिळेल, असा दावा करण्यात आला आहे.
- युझर्स यात म्यूझिक प्ले आणि पॉझ देखील करू शकतात.




