actor chandrashekhar vaidya mahamantri sumant of ramayan dies
मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते चंद्रशेखर वैद्य यांचे निधन, रामायणात साकारली होती ‘महामंत्री सुमंत’ ची भूमिका

मुंबई : दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. रामायण मालिकेमध्ये राजा दशरथ यांचे महामंत्री सुमंत यांची भूमिका साकारणारे कलाकार चंद्रशेखर वैद्य यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ते ९८ वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

चंद्रशेखर वैद्य यांचा जन्म १९२३ साली हैदराबाद येथे झाला. चंद्रशेखर यांनी शालेय वयातच अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. चंद्रशेखर यांचे आयुष्य अतिशय खडतर होते. त्यांच्याकडे काम नव्हते तेव्हा त्यांनी सुरक्षा रक्षकाचे कामही केले होते. चंद्रशेखर यांनी भारत छोडो आंदोलनातही सहभाग घेतला होता. अभिनयाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या चंद्रशेखर यांनी सिंटाची स्थापना केली होती. चंद्रशेखर यांनी त्यांच्या करिअरमध्ये ११० हून अधिक सिनेमांमध्ये काम केले. त्यात १९६४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘चा चा चा’ आणि १९६४ मध्ये आलेला ‘स्ट्रीट सिंगर’ या सिनेमांचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. त्यानंतर अनेक सिनेमांमध्ये त्यांनी काम केले.

चंद्रशेखर हे रामानंद सागर यांचे खूप जवळचे मित्र होते. रामानंद सागर यांची निर्मिती असलेल्या ‘रामायण’ मालिकेमध्ये चंद्रशेखर यांनी महामंत्री सुमंत ही भूमिका साकारली. या भूमिकेने त्यांना खूप लोकप्रियता मिळवून दिली होती.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत