Accidental death of actress Vaibhavi Upadhyay, car fell into 50 feet deep ravine

अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिचे अपघाती निधन, कार 50 फूट खोल दरीत कोसळून अपघात

मनोरंजन

हिमाचल प्रदेश : लोकप्रिय शो ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ फेम अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिचे निधन झाले आहे. एका कार अपघातात अभिनेत्रीला आपला जीव गमवावा लागला. तिची कार जवळपास 50 फूट खोल दरीत कोसळल्याने ही दुःखद घटना घडली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, वैभवी काही दिवसांपासून हिमाचल प्रदेशात होती. सोमवारी ती तिचा होणारा नवरा जय सुरेश गांधीसोबत फिरायला गेली होती. वैभवी आणि जय दोघेही बंजारच्या तीर्थन व्हॅलीला भेट देण्यासाठी येत होते. ते दोघे फॉर्च्युनर कारमध्ये होते. तीर्थक्षेत्र बंजार खोऱ्यात फिरायला जात असताना बंजारजवळील सिधवा येथे त्यांच्या कारचे अचानक नियंत्रण सुटले आणि त्यानंतर कार रस्त्याच्या कडेला जवळपास 50 फूट खोल दरीत कोसळली.

अभिनेत्रीच्या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पोलिसांनाही या अपघाताची माहिती दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी वैभवीला कारमध्ये पाहिले, मात्र तिचा मृत्यू झाला होता. स्थानिक लोकांनी जय सुरेश गांधी यांना गाडीतून बाहेर काढले. त्यांना किरकोळ जखमा झाल्या असून उपचारासाठी बंजार रुग्णालयात पाठवण्यात आले.

 

वैभवीचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. वैभवी यांच्या पार्थिवावर आज दुपारी भाभाई हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

वैभवी उपाध्याय टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिने अनेक टीव्ही शोमध्ये काम केले. अभिनेत्री ‘क्या कसूर है अमला का’ मध्येही दिसली होती. ती वेब सीरिजमध्येही दिसली होती, पण ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ या मालिकेतून अभिनेत्रीला मोठी ओळख मिळाली. या शोमधील तिच्या पात्राचे नाव जस्मिन होते. अभिनेत्रीच्या भूमिकेला आणि अभिनयाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. टीव्ही शोशिवाय वैभवीने दीपिका पदुकोणच्या ‘छपाक’ चित्रपटातही काम केले होते.

अभिनेत्रीच्या निधनाने संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. वैभवी आता आपल्यासोबत नाही यावर चाहते आणि सेलिब्रिटींचा विश्वास बसत नाहीये.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत