Fire breaks out at Delhi's Lajpat Nagar market, 16 fire tenders rushed to spot
देश

दिल्लीतील लाजपत नगर मार्केटमधील शोरूममध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतील लाजपत नगर मार्केटमधील एका कपड्यांच्या शोरूममध्ये भीषण आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी 10.30 च्या सुमारास सेंट्रल मार्केटमधील केएफसीजवळ कपड्यांच्या शोरूममध्ये आग लागल्याची घटना घडली. भीषण आग पाहून आसपासच्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दिल्ली फायर सर्व्हिसचे प्रमुख अतुल गर्ग म्हणाले की, आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. परंतु, आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत