नवी दिल्ली : : Fire Boltt 360 स्मार्टवॉच भारतीय मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. युजर्संच्या हेल्थवर फोकस करून यात अनेक हेल्थ फीचर्स आणि ट्रॅकर्स देण्यात आले आहेत. हे प्रोडक्ट खूपच कमी किंमतीत लॉन्च केले आहे. हे स्मार्टवॉच गोल्ड, ब्लॅक आणि सिल्वर कलर मध्ये उपलब्ध होईल. Fire Boltt 360 ला भारतात ३ हजार ४९९ रुपयांत लॉन्च करण्यात आले आहे.
Fire Boltt 360 स्मार्टवॉच स्टाइल, फीचर्स आणि स्पेक्समध्ये जबरदस्त आहे. तसेच याची किंमत सुद्धा खूपच कमी आहे. यात अनेक इनबिल्ट गेम्स आणि अन्य मनोरंजनाचे पर्याय दिले आहेत. हे स्मार्टवॉच कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून खरेदीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.
Fire Boltt 360 चे स्पेसिफिकेशन्स :
- Fire Boltt 360 मध्ये १.३ इंचाचा कलर डिस्प्ले दिला आहे.
- हे राउंड शेप्ड डिझाइन आणि मेटल बिल्ड सोबत बनवले आहे.
- यात रोटेटिंग यूआय दिले आहे. याचा अर्थ याचा मेन्यू सर्कुलर फॉर्म मध्ये दिसेल. याला नेविगेट केले जाऊ शकते.
- Fire Boltt 360 मध्ये SPO2 मॉनिटर दिले आहे, जे ब्लड ऑक्सिजन लेवल तपासण्यासाठी मदत करते.
- यात 24×7 हार्ट रेट मॉनिटर आणि ब्लड प्रेशर ट्रॅकर सुद्धा दिले आहे.
- हे स्मार्टवॉच एकदा फुल चार्ज केल्यानंतर ८ दिवस बॅटरी बॅक अप देते.
- यात अनेक इन बिल्ट गेम्स दिले आहेत.




