people of the village scared from corona vaccine jumped into the river in barabanki up
देश

जिवापेक्षा भीती मोठी! कोरोना लसीच्या भीतीमुळे ग्रामस्थांनी घेतल्या नदीत उड्या

उत्तर प्रदेश : एकीकडे कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लस घेण्याकरिता देशभरातील आरोग्य केंद्रांवर लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. तर बाराबंकीमध्ये एक विचित्र दृश्य पाहायला मिळाले. आरोग्य विभागाची टीम एका गावात कोरोना लस देण्यासाठी पोहोचली, मात्र मेडिकल टीमला बघताच काही ग्रामस्थांनी लसीकरण टाळण्यासाठी सरयू नदीत उड्या घेतल्या.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, रामनगरच्या सिसोदा गावात शनिवारी आरोग्य विभागाची टीम गावकऱ्यांना कोरोनाची लस देण्यासाठी गेली होती. मात्र, लसीची भीती मनात असल्यामुळे बहुतेक गावकरी गावाबाहेरच्या सरयू नदीजवळ उभे होते. मेडिकल टीमला बघताच त्यांनी नदीत उड्या घेतल्या. त्यानंतर अधिकाऱ्यांनी या लोकांना बोलावून समजावून सांगितले. तरीदेखील केवळ 14 जणांनी लस घेतली. या गावात वेगाने पसरणार्‍या कोरोना संसर्गानंतर आरोग्य विभागाची टीम शनिवारी लसीकरणासाठी आली होती.

दिलासादायक : भारतात बनलेली नेजल व्हॅक्सिन लहान मुलांसाठी ठरू शकते गेम चेंजर, WHO चा दावा

उपजिल्हाधिकारी राजीव शुक्ला यांनी या संदर्भात सांगितले कि, “मी गावकऱ्यांना समजवायला गेलो होतो. पण त्यांनी नदीत उड्या घेतल्या. त्यानंतर त्यांना समजावून सांगितले. त्यानंतरही केवळ 14 लोकांनी पुढे येऊन लस घेतली.” दरम्यान, या घटनेमुळे लोकांच्या मनात कोरोना लसीविषयी असलेली भीती पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. लोकांच्या मनातील ही भीती घालवण्यासाठी जनजागृतीची गरज आहे.

भयंकर : एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या, तीन लहान मुलांचा समावेश

कोरोनाकाळात आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या बालकांसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत