sushant deathcase cbi inquiry
मनोरंजन

महाराष्ट्र पोलिसांकडून सुशांतच्या एक्स मॅनेजरची फाईल चुकून डिलीट

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी बिहार पोलीस मुंबईत दाखल झाले असून तपास करत आहेत. सुशांतच्या मृत्यूचा त्याची एक्स-मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूशी काही संबंध आहे का, यादृष्टीने बिहार पोलीस शोध घेत आहेत. याचसाठी बिहार पोलीस मालवणी पोलीस ठाण्यात पोहोचले होते. मात्र यावेळी त्यांना दिशा सालियनशी संबंधित फोल्डर डिलीट झाल्याचं सांगण्यात आलं. इंडिया टुडेने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

बिहार पोलिसांना दिशाच्या आत्महत्येशी संबंधित फोल्डर चुकून डिलीट झाला असून तो पुन्हा मिळवणं शक्य नाही असं सांगण्यात आलं. पोलीस अधिकारी केसशी संबंधित सर्व माहिती शेअर करण्यास तयार होते. पण एका फोनमुळे परिस्थिती अचानक बदलली. बिहार पोलिसांनी फोल्डर पुन्हा मिळवण्यासाठी मदत देऊ केली, पण त्यांना लॅपटॉप देण्यास नकार देण्यात आला.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत