नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्री शिंदे दोन दिवसांच्या दिल्ली भेटीवर असून त्यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या दिल्लीतील निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा व छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनकार्यावरील पुस्तक मुख्यमंत्री शिंदे यांना भेट दिले. यावेळी […]
टॅग: संभाजीराजे छत्रपती
संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीला शरद पवार यांचा पाठिंबा
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला आहे. आमचा एक उमेदवार निवडून येण्यासाठी आवश्यक असलेल्या मतांचा कोटा पूर्ण झाल्यावर राहिलेली मत त्यांना देऊ असं शरद पवार म्हणाले आहेत. संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेवरील राष्ट्रपती नियुक्त खासदारकीची मुदत संपल्यानंतर पत्रकार परिषद घेत नवी राजकीय भूमिका जाहीर केली होती. […]
नरेंद्र मोदी यांच्या हातात हुकूमाची पाने, मराठा आरक्षणाबाबत संजय राऊत यांचं स्पष्टीकरण
मुंबई : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतली आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट केली. आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी संभाजीराजेंच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे. तसंच मराठा आरक्षण मिळवण्यासाठी पुढे काय करावं लागेल, याबाबतही राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. संजय राऊत यांनी म्हटलं कि, “संभाजीराजे […]



