पुणे, दि. ६ : “दारू पिणे आरोग्यास हानिकारक आहे” असा इशारा मद्याच्या प्रत्येक बाटलीवर छापलेला असतो. मात्र, या इशाऱ्यांचा केंद्रबिंदू मुख्यतः शारीरिक आरोग्यावर असतो. मद्यपानामुळे होणारे मानसिक परिणामही तितकेच गंभीर असून, त्याबाबत जनजागृती करणेही तितकेच आवश्यक आहे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विल्यम साळवी यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. साळवी यांनी दिलेल्या निवेदनात […]
टॅग: व्यसनमुक्ती
व्यसनमुक्तीवरील तुमच्या कार्याचा व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी नक्की फायदा होईल, डॉ. सोमनाथ गिते यांचे राज्यपालांकडून कौतुक
पुणे : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नुकतेच पुण्यात आले होते. यावेळी डॉ. सोमनाथ गिते यांनी त्यांची भेट घेतली आणि व्यसनमुक्ती या विषयावर चर्चा केली. राज्यपालांनी डॉ. सोमनाथ गिते यांच्या कार्याचे कौतुक केले व प्रशंसापत्र दिले. तसेच व्यसनमुक्तीचे कार्य आवश्यक असून हे कार्य असेच सुरु ठेवा, व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी तुमच्या कार्याचा नक्की फायदा होईल, असेही […]
सोमनाथ गिते यांचा मा. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सत्कार
संगमनेर : व्यसनमुक्तीबाबत जनजागृती केल्याबद्दल संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथील सोमनाथ गिते यांचा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गिते यांच्या कार्याची दखल घेत सामाजिक न्याय व विशेष साहाय्यक विभाग व यश मेडिकल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जामगाव येते झालेल्या व्यसनमुक्ती संमेलनात बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते व्यसनमुक्ती गौरव पुरस्कार २०२२ देऊन […]
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून सोमनाथ गिते यांच्या व्यसनमुक्ती कामाचे कौतुक
पुणे, ता. १८ : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सोमनाथ गिते यांच्या लिखाणाचे कौतुक केले आहे. गिते यांनी मागील काही काळापासून व्यसनमुक्तीवर सातत्याने लिखाण केले आहे. तसेच अनेक शाळा-कॉलेजमध्ये जाऊन देखील व्यसनमुक्तीबाबत विचार मांडले आहेत. यामधून त्यांनी तंबाखू, सिगारेट, दारूसारख्या व्यसनाधीनतेतून समाजाचे झालेले नुकसान आणि सद्यस्थिती मांडण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. याची दखल घेत […]
महसूलमंत्र्यांकडून गिते यांच्या व्यसनमुक्ती कामाचे कौतुक..
पुणे, ता. 11 : राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी श्री. सोमनाथ गिते यांच्या लिखाणाचे कौतुक केले आहे. गिते यांनी मागील काही काळांपासून व्यसनमुक्तीवर सातत्याने लिखाण केले आहे. यामधून त्यांनी तंबाखू, सिगारेट, दारूसारख्या व्यसनाधीनतेतून समाजाचे झालेले नुकसान आणि सद्यस्थिती मांडण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. वर्तमानपत्रे व अन्य काही माध्यमांतून त्यांनी व्यसनामुळे समाजाच्या झालेल्या नुकसानाचे भीषण वास्तव […]




