Dr. B.R. Ambedkar Mahaparinirvan Diwas 2025 Chaityabhoomi Mumbai
महाराष्ट्र मुंबई

महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : देशभरातून महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी परिसर तसेच मुंबईत लाखोंच्या संख्येने अनुयायी येतात. येणाऱ्या अनुयायांची सुरक्षितता आणि सोयीसुविधांसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. चैत्यभूमी येथे उभारल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासंदर्भात विविध सूचना प्राप्त झाल्या असून याबाबत समन्वय समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. […]

Godowns will be constructed to store paddy - Minister Dr. Ashok Vuike
महाराष्ट्र मुंबई

धान साठा करण्यासाठी गोदामांची उभारणी करण्यात येणार – मंत्री डॉ. अशोक वुईके

मुंबई : आदिवासी विकास महामंडळामार्फत आदिवासी उपयोजना क्षेत्रामध्ये आधारभूत खरेदी योजनेंतर्गत धान खरेदी करण्यात येते. आदिवासी क्षेत्रात शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले धान उघड्यावर राहून पावसाळ्यात भिजून खराब होऊ नये, यासाठी गोदामांची उभारणी करण्यात येणार असून यामुळे हे नुकसान टाळता येणार असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी सांगितले. आदिवासी विकास मंत्री डॉ. वुईके यांच्या अध्यक्षतेखाली […]

Shiv Sena follows up on the growing problem of traffic congestion at Pari Chowk
पुणे महाराष्ट्र

पुणे : नऱ्हे येथील पारी चौकातील वाहतूक कोंडीच्या वाढत्या समस्येचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून पाठपुरावा, उपाययोजनांची अपेक्षा…

पुणे : धायरी (नऱ्हे) येथील पारी चौक परिसरात दररोज होणाऱ्या भीषण वाहतूक कोंडीने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे विभागप्रमुख महेश राजाराम पोकळे यांनी वाहतूक विभागाकडे अधिकृत निवेदन सादर केले आहे. या निवेदनात त्यांनी स्पष्टपणे नमूद केले […]