Nagpur Infant Death | Suspected Animal Attack in Narsala Hudkeshwar Area
नागपूर महाराष्ट्र

हृदयद्रावक! अज्ञात प्राण्याने आईच्या कुशीतून ८ महिन्यांच्या चिमुकलीला उचललं, छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला मृतदेह

नागपूर : नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नरसाळा गावाच्या मागील भागात मंगळवारी पहाटे एक हृदयद्रावक घटना घडली. स्मशानभूमीजवळील नाल्याच्या पलीकडे असलेल्या मजूर वस्तीमध्ये अज्ञात प्राण्याच्या हल्ल्यात अवघ्या ८ महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून स्थलांतरित मजूर कुटुंबांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. मृत चिमुकलीचे नाव अनुष्का रवी मेळा […]

Leopard Attack in Ahilyanagar: Leopard Drags Away 5-Year-Old Girl in Front of Mother
अहिल्यानगर महाराष्ट्र

अहिल्यानगरमध्ये हृदयद्रावक घटना! बिबट्याने आईच्या डोळ्यादेखत पाच वर्षांच्या मुलीला उचलून नेलं

अहिल्यानगर : मागील काही दिवसांपासून अहिल्यानगर शहरासह परिसरात बिबट्यांचा वावर वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नरभक्षक बिबट्यांकडून वारंवार हल्ले होत असतानाच आता पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका बिबट्याने आईच्या डोळ्यादेखत पाच वर्षांच्या मुलीला उचलून नेल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. ही घटना अहिल्यानगर तालुक्यातील खारेकर्जुने गावात बुधवारी (१२ नोव्हेंबर) […]

Crocodile found near Bhide bridge in Pune
पुणे महाराष्ट्र

पुण्यातील भिडे पुलाजवळ मगर आढळली, रेस्क्यू टीम, वनविभाग आणि पोलीस घटनास्थळी दाखल

पुणे : पुण्यातील भिडे पुलाजवळ मगर आढळल्याची चर्चा सुरु आहे. लकडी पूल ते भिडे पुलाच्यामधील मुठा नदी पात्रात सकाळी दहाच्या सुमारास मगरसदृश्य प्राणी आढळला, असं एका अज्ञाताने सांगितलं होतं. तसा कॉल अॅनिमल रेस्क्यू टीमला आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, भिडे पुलाजवळ मगर आढळल्याची चर्चा झाल्यामुळे भिडे पूल आणि झेड ब्रिजवर बघ्यांची गर्दी देखील वाढली आहे. […]