उत्तर प्रदेशात लव्ह जिहाद विरोधात नवीन अध्यादेश लागू करण्यात आला आहे. बरेलीमध्ये या अध्यादेशातंर्गत पहिला एफआयआर नोंदवण्यात आला. या प्रकरणात आरोपी ओवैस अहमदला (२१) बुधवारी अटक करण्यात आली. हिंदू मुलीला इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी जबरदस्ती केल्याचा तसेच मुलीच्या पालकांनी धर्मांतरावर आक्षेप घेतल्यानंतर त्यांना धमकावल्याचा त्याच्यावर आरोप आहे. ओवैसचे हिंदू मुलीबरोबर प्रेमसंबंध होते. मागच्यावर्षी ते पळून गेले. […]

