मुंबई : ‘रोजच्या जगण्यातील छोट्या प्रसंगांतून कुशलतेने हास्य फुलवणारा आणि आपल्या निखळ शैलीने देशभरातील घराघरात पोहोचलेला कलावंत गमावला आहे,’अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ हास्य कलाकार, अभिनेता राजू श्रीवास्तव यांना निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे. ‘आपल्या रोजच्या जगण्यातील दमछाक करणाऱ्या प्रसंगांतूनही हास्य फुलवण्याची किमया राजू श्रीवास्तव यांनी साध्य केली. त्यांनी हास्यरंगाच्या अनेक छटा उलगडून […]
टॅग: राजू श्रीवास्तव
राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा, 15 दिवसांनंतर उघडले डोळे
नवी दिल्ली : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव गेल्या १५ दिवसांपासून रुग्णालयात आहेत. राजू हे सध्या दिल्लीतील एम्समध्ये दाखल आहेत, तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आता त्यांना शुद्धी आली आहे. राजूच्या व्यवस्थापकाने सांगितले की कॉमेडियनची प्रकृती स्थिर आहे आणि तो हळूहळू बरा होत आहे. व्यवस्थापकाने पुढे सांगितले की एम्समधील डॉक्टर देखील त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून […]
राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक, मेंदूलाही हानी पोहोचल्याची डॉक्टरांची माहिती
नवी दिल्ली : राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्याच्या दोन दिवसांनंतरही ते बेशुद्ध आहेत आणि अजूनही व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असून हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांच्या मेंदूचे प्रचंड नुकसान झाले आहे. एम्सकडून मिळालेल्या माहितीनुसार, हृदयविकाराच्या झटक्याने राजू श्रीवास्तव यांच्या मेंदूला मोठा फटका बसला. सध्या ते व्हेंटिलेटरवर असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. राजू श्रीवास्तव यांची प्रकृती जशी […]
राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक, अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियेनंतरही व्हेंटिलेटरवर
नवी दिल्ली : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना एम्समध्ये व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. वृत्तानुसार, राजू श्रीवास्तव यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मात्र, तरीही त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. राजू यांच्या हृदयात ९५ टक्के ब्लॉकेज असल्याचं सांगण्यात येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजू यांच्या हृदयाच्या मुख्य धमनीत ब्लॉकेज आहे. […]


