मुंबई : राज्यात यापुढे बांधण्यात येणाऱ्या निवासी आणि वाणिज्य इमारतींमध्ये हिरकणी कक्ष तयार करण्यात येणार असून, त्या जागेचा एफएसआय मोजण्यात येणार नाही. याशिवाय प्रत्येक पोलीस ठाण्यात हिरकणी कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत जागतिक महिला दिनानिमित्त अध्यक्षांनी मांडलेल्या प्रस्तावास उत्तर देताना सांगितले. मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले, राज्यात नवीन रस्ते बांधतांना नियमानुसार […]
टॅग: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कंटेनर अंगणवाडी उपयुक्त संकल्पना – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : जागेची टंचाई असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रासारख्या ठिकाणी कंटेनर अंगणवाड्या ही उपयुक्त संकल्पना महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येत असून बालक आणि पालकांसाठी ही अंगणवाडी निश्चितच सहायक ठरेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज येथे सांगितले. विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज कंटेनर अंगणवाडी उपक्रमांतर्गत जानुपाडा, कांदिवली, […]
राज्यांचे ब्रँडींग करताना कार्यक्रमांमध्ये लोकसहभाग महत्त्वाचा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
जी २० परिषद बैठकांसाठी मुंबई सज्ज – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही मुंबई : भारतात येत्या वर्षभरात होणाऱ्या जी २० परिषदेच्या बैठका आणि कार्यक्रमांच्या पूर्वतयारीबाबत आढावा घेण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांचे राज्यपाल, उपराज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांशी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. महाराष्ट्रात दि. १२ डिसेंबरपासून जी २० परिषदेच्या बैठकांना मुंबईत सुरूवात होणार असून त्यासाठी मुंबई […]
महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढवणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढविण्याचा विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित वैद्यकीय सन्मान सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय […]
लाभार्थी उद्योजकांच्या व्यवसायांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ
मुंबई : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करणाऱ्या उद्योजकांच्या व्यवसायाचा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. नवउद्योजकांना त्यांच्या फूड व्हॅन आणि प्रवासी टॅक्सीच्या चाव्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आल्या. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह आदी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत […]
लोकहिताला शासनाचे प्राधान्य, शेतकरी हा शासनाचा केंद्रबिंदू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : “आम्ही लोकांसाठी काम करत असून लोकांपर्यंत पोहोचणारे हे सरकार आहे. लोकांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी लोकहिताला आम्ही प्राधान्य देत आहोत”, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सकाळ माध्यम समूहाच्या ‘साम मराठी’ वृत्त वाहिनीतर्फे आयोजित सामर्थ्य महाराष्ट्राचे – वेध भविष्याचा- मंथन विकासाचे या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, “राज्याचा […]
अवजड वाहतुकीसाठी उड्डाणपूल फायदेशीर ठरेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे : मुंब्रा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वरील वाय जंक्शन येथे एमएमआरडीएने उभारलेल्या उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. या उड्डाणपुलामुळे हजारो वाहनांना आणि लाखो प्रवाशांना फायदा होणार असून प्रत्येक फेरीला त्यांच्या वेळेत सुमारे ३० मिनिटांची बचत होणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. एमएमआरडीएच्या वतीने मुंब्रामधील राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वरील वाय जंक्शन […]
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प देशात पथदर्शी ठरेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुणे : जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात येणारा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाअंतर्गत मिसिंग लिंक प्रकल्प हा देशात पथदर्शी प्रकल्प होणार असून लाखो प्रवाशांना फायदेशीर ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. डिसेंबर २०२३ पर्यंत हा प्रकल्प पूर्णत्वास येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते कुसगाव या […]
अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांनी योजनांचा लाभ घेण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
मुंबई : मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज तर उद्योग- व्यवसायासाठी मुदत कर्ज आणि सूक्ष्म पतपुरवठा योजना राबविण्यात येत आहेत. यासाठी केंद्र शासनाकडून निधी कर्जस्वरुपात उपलब्ध झाला असून या योजनांचा लाभ घेण्यासाठी महामंडळाकडे अर्ज करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. अल्पसंख्याक विभागाच्या शैक्षणिक कर्ज, मुदत कर्ज आणि […]
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! रांजणगावमध्ये इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरसाठी केंद्र सरकारची मान्यता, ५००० तरुणांना रोजगार उपलब्ध होणार
पुणे : राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणांतर्गत रांजणगाव (पुणे) येथे 297.11 एकरमध्ये इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरसाठी केंद्र सरकारने आज मान्यता दिली आहे. या माध्यमातून 5000 तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहेत. हा प्रकल्प राज्यात आणल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आभार मानले आहेत. तसेच पुण्यामध्ये CDAC हाही प्रकल्प लवकरच येणार असून या […]









