Rishabh Pant, Shardul Thakur and Pravin Amre fined for IPL code of conduct breach
क्रीडा

नो-बॉल प्रकरणातील वाद पडला महागात, ऋषभ पंत, शार्दुल ठाकूर आणि प्रवीण अमरे यांच्यावर मोठी कारवाई…

IPL 2022 : दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतला नो-बॉलच्या वादाला खतपाणी घातल्याप्रकरणी आणि राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात अडथळा आणल्याबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि आयपीएल आयोजकांनी दंड ठोठावला आहे. पंतशिवाय दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाज शार्दुल ठाकूर यालाही दंड ठोठावला आहे. तसेच दिल्ली कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण अमरे यांनाही दंड ठोठावण्यात आला, जे सामन्यादरम्यान मैदानावर गेले होते. […]