जळगावमधील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नृत्य करण्यास भाग पाडण्यात आल्याच्या मुद्द्यावरून काळ विधानसभेत बराच वादविवाद झाला. त्यानंतर आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याप्रकरणी निवेदन सादर करत सहा महिला अधिकाऱ्यांनी सादर केलेला अहवाल पटलावर मांडला. अनिल देशमुख यांनी यावेळी पोलिसांवर लावण्यात आलेल्या आरोपात तथ्य नसल्याचं सांगत असं काही घडलंच नसल्याची माहिती दिली. […]

