फिलिपिन्स : फिलिपिन्सच्या एका सापाच्या एक्सपर्टचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे. पंगासिनान प्रांतातील या सापाच्या एक्सपर्टने गर्दी समोर कोब्रा सापाला किस करण्याचा प्रयत्न केला होता. या एक्सपर्टने दावा केला होता सापांच्या विषाने त्याला कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही, कारण त्याच्यामध्ये त्याविरुद्ध लढण्यासाठी इम्युनिटी आहे, परंतु, त्याचा हा दावा चुकीचा ठरला आणि काही मिनिटातच त्याचा मृत्यू झाला. […]

