वर्धा : वर्धा जिल्ह्यातील शेडगाव जवळील जुनापाणी परिसरात चिमुकल्या बहीण-भावाचा बुडून मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. बहीण- भाऊ शेतात खेळत असताना ही दुर्दैवी घटना घडली. शेतातील तलावात बुडून दोघांचा मृत्यू झाला. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, नागपुरात राहणारे पंचभाई यांचे शेडगाव येथील जुनापाणी परिसरात शेत आहे. त्यांनी मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील एका कुटुंबाला शेतीच्या कामासाठी आणले […]

