Famous actor Anil Nedumangad drowned in a dam during filming
मनोरंजन

प्रसिद्ध अभिनेता अनिल नेदुमंगड यांचा चित्रीकरणादरम्यान धरणात बुडून मृत्यू

मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अनिल नेदुमंगड यांचा मृत्यू झाला आहे. ४८ वर्षीय अनिल केरळच्या मलंकारा धरणात आंघोळीसाठी गेले होते. धरणात बुडून त्यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अनिल हे थोडुपुझा इथे आपल्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण करत होते. सीन संपल्यानंतर चित्रपटाच्या टीमने ब्रेक घेतला तेव्हा अनिल आपल्या काही मित्रांसह धरणात आंघोळीसाठी गेले. याचवेळी त्यांच्यासोबत ही दुर्घटना घडली. […]