महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा – मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून काजू आणि इतर कृषी उत्पादनांच्या निर्यातीची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. याविषयी मंत्रालयात आयोजित बैठकीवेळी ते बोलत होते. बैठकीस महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे, मित्राचे सल्लागार परशराम पाटील यांच्यासह जेएसडब्ल्यू ग्रुपचे प्रतिनिधी उपस्थित […]

Mumbai to Konkan Sea Passenger Transport Approved
महाराष्ट्र मुंबई

कोकणवासीयांसाठी सागरी प्रवासी वाहतूकीस मान्यता

मुंबई : मुंबई येथून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणाऱ्या कोकणवासीयांसाठी सागरी प्रवासी जलवाहतूक मार्गास मान्यता देण्यात आली आहे. मुंबईपासून या मार्गावर प्रवासी सागरी जलवाहतूक प्रथमच सुरू होत असून हे क्रांतिकारी पाऊल ठरणार आहे, असे प्रतिपादन मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले. माझगाव भाऊचा धक्का येथे एम टू एम प्रिन्सेस या रो-रो कंपनीची […]

Indian Railways to Run 367 Extra Trains for Ganeshotsav 2025 in Maharashtra
महाराष्ट्र मुंबई

गणेशभक्तांसाठी यंदा रेल्वेच्या ३६७ जादा फेऱ्या

मुंबई : गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा मानबिंदू. या उत्सवासाठी कोकणात तसेच राज्यभरात इतरत्र जाण्यासाठी गणेशभक्तांना प्रवास करावा लागतो. या प्रवासासाठी रेल्वेचा आधार महत्वाचा ठरतो. यासाठी यंदा भारतीय रेल्वेने दरवर्षी पेक्षा यंदा ३६७ जादा फेऱ्यांसाठी रेल्वेगाड्या सोडण्याची नियोजन केल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती देतानाच, राज्यातील तमाम गणेशभक्तांच्यावतीने […]

महाराष्ट्र मुंबई

राज्यात आज व उद्या अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : मध्य भारतावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असून याच्या प्रभावामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र (प्रामुख्याने घाट परिसर), मुंबई महानगर प्रदेश, आणि मराठवाड्यात (प्रामुख्याने पश्चिम आणि दक्षिण भाग) 18 ते 19 ऑगस्ट दरम्यान जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यात प्रामुख्याने कोकणातील सर्वच जिल्हे; नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, पालघर, ठाणे, उर्वरित मुंबई महानगर; […]

27 thousand 797 cusecs discharge from Veer Dam in Satara district; Alert issued
महाराष्ट्र रत्नागिरी

सातारा जिल्ह्यातील वीर धरणातून २७ हजार ७९७ क्युसेक्स विसर्ग; सतर्कतेचा इशारा

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. नागरीकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सातारा जिल्ह्यातील वीर धरणातून आज दिनांक २६ जून रोजी २७ हजार ७९७ क्युसेक्स विसर्ग नीरा नदी पात्रात सुरू आहे. नदी काठच्या नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे. कोकण किनारपट्टीला आज २६ […]

Will verify diesel refunds to mango and cashew farmers in Konkan - Minister Dadaji Bhuse
महाराष्ट्र मुंबई

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना डिझेल परताव्याबाबत पडताळणी करणार – मंत्री दादाजी भुसे

मुंबई : कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना फवारणीकरिता डिझेल लागते. कोकणासह राज्यातही फवारणी करताना डिझेलची आवश्यकता असते. कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना डिझेल परतावा देण्याबाबत पडताळणी करण्यात येईल, असे मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या डिझेल परताव्याबाबत सदस्य रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला […]

Maharashtra Weather Updates rain forecast Konkan Western Maharashtra Vidarbha
महाराष्ट्र

उद्यापासून राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता, 24 जूनपासून पावसाचा जोर वाढणार

मुंबई : काही दिवसापासून राज्यातील वातावरणात बदल होत आहेत. मात्र, अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, हवामान खात्याने उद्यापासून (23 जून) राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकणातील काही भागांसह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे. तसेच 24 आणि 25 जूनपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. 21 […]

Let's preserve Konkantwa and develop all round Konkan - Minister Deepak Kesarkar
महाराष्ट्र

कोकणत्व जपून कोकणचा सर्वांगीण विकास करूया – मंत्री दीपक केसरकर

मुंबई : ‘राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. याअंतर्गत कोकणचा कॅलिफोर्निया करायचा आहे, मात्र कोकणचे कोकणत्व जपून’ असे प्रतिपादन शालेय शिक्षण तथा मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी केले. महासंस्कृती व्हेंचर्सच्या वतीने ‘कोकण सन्मान २०२२’ कार्यक्रमात मंत्री केसरकर यांच्या हस्ते कोकणातील संस्कृतीचा वारसा जतन करण्यासाठी योगदान देणाऱ्या विविध व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान […]

Low interest rate loan for cashew growers in Konkan
महाराष्ट्र

कोकणातील काजू उत्पादकांसाठी अल्प व्याजदरात कर्ज

मुंबई : कोकणाच्या शाश्वत विकासासाठी कोकणात मत्स्यव्यवसाय, फळबाग, दुग्धव्यवसायासह पर्यटन वाढीसाठी राज्य सरकार विशेष प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर कोकणातील काजू उत्पादकांना दिलासा देण्यासाठी काजू उत्पादकांना अल्प व्याजदरात भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून व्याज दर सवलत योजना राबविण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती […]

Maharashtra Weather Updates rain forecast Konkan Western Maharashtra Vidarbha
महाराष्ट्र

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

मुंबई : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून राज्यात कोकण व मध्य महाराष्ट्रातही मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव व औरंगाबाद या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टदेखील जारी करण्यात आला […]