मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे मराठा समाजातील व्यक्तींना व्यवसाय करण्यासाठी आर्थिक मदत म्हणून 10 हजार रुपये बिनव्याजी कर्ज प्रतीदिन रु. 10 प्रमाणे परतफेडीच्या अटीवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे अशी माहिती, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. मराठा समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासासोबतच मराठा आरक्षण […]
टॅग: उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत
बंद दस्तनोंदणीबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येणार
मुंबई : राज्यात तुकडेबंदी व ग्राम पंचायत हद्दीतील सदनिकांची दस्तनोंदणी बंद असून त्यामुळे सर्वसामान्य सदनिकाधारकांना अडचणी येत असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सांगून सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी गुंठेवारीतील जाचक अटी दूर होईपर्यंत दस्त नोंदणी त्वरित सुरु करण्याबाबत विभागाने त्वरित प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. आज मंत्रालयात महसूल […]
पुणे महानगरपालिकेने नागरिकांकडून वाढीव मिळकत कर वसूल करू नये, चंद्रकांत पाटील यांनी दिल्या सूचना
मुंबई : पुणे महानगरपालिकेच्या वतीने मिळकत करामध्ये दिली जाणारी ४० टक्के सवलत पुन्हा लागू करावी, अशी नागरिकांची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बैठक घेऊन यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. आज मंत्रालयात याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. मंत्री पाटील म्हणाले, मिळकत […]
विद्यार्थ्यांची वसतिगृहाबाबत गैरसोय होणार नाही असे नियोजन करावे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : विद्यार्थ्यांना वेळेत वसतिगृह प्रवेश न मिळाल्यास त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे वसतिगृहाच्या देखभाल, नूतनीकरण, दुरुस्ती अशा प्रशासकीय अडचणीमुळे विद्यार्थी वसतिगृह प्रवेशापासून वंचित रहाणार याची खबरदारी घेऊन वसतिगृहाच्या अडचणी तातडीने दूर करण्यासाठी कालबद्ध पद्धतीने नियोजन करावे, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. मंत्रालयात मुंबईतील शासकीय वसतीगृह महाविद्यालय, संस्थाबाबत […]
प्राध्यापकांची २०८८ तर प्राचार्यांची ३७० रिक्त पदे भरण्यास मान्यता
मुंबई : उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील 2088 सहाय्यक प्राध्यापक व 370 प्राचार्य या संवर्गातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. आरोग्य विषयक कारणास्तव प्रलंबित असलेल्या भरती प्रक्रियेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वित्त विभागाने भरती प्रक्रियेवरील […]
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तातडीने वितरित करावी, उदय सामंत यांचे आदेश
मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना विविध विभागाच्यावतीने शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्क देण्यात येते परंतु विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यात तांत्रिक अडचणी येतात. त्या तातडीने दूर करून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरित करण्यात यावी, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले. मंत्रालयात विद्यार्थ्यांच्या प्रलंबित शिष्यवृत्ती संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. सामंत म्हणाले, विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्याबरोबरच […]
रोबोट करणार कोविड निर्जंतुकीकरण, UV-360 सॅनिटायझर मॉड्युल रोबोटचे ई-उद्घाटन
कोविडचा सामना करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान शोधण्यात महाराष्ट्र राज्यातील तंत्रज्ञ काम करीत असून कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या पुढाकाराने तयार केलेले युव्ही-३६० सॅनिटायझर मॉड्युल रोबोट उपयुक्त ठरेल, असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. सध्या हा रोबोट नागपुरात ठेवण्यात आला असून त्याचे ई-उद्घाटन मान्यवरांच्या ऑनलाईन उपस्थितीत झाले. उदय सामंत म्हणाले कि, रुग्णालये, […]






