मुंबई : सन २०२२-२३ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी शासनाने शालेय शिक्षण स्तरावर प्रवर्गनिहाय १०८ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. या शिक्षकांना ५ सप्टेंबर २०२३ या शिक्षक दिनी मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे. पुरस्कार जाहीर झालेल्या सर्व शिक्षकांचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी अभिनंदन केले आहे. समाजाची निःस्वार्थ भावनेने आणि […]
टॅग: teachers
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या प्रदानासाठी एनपीएस खाते अनिवार्य
मुंबई : राज्यातील अशासकीय अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालयातील पूर्णवेळ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे. तथापि ९९८२ शिक्षक/शिक्षकेतरांनी त्यांना परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू असतानाही, ही योजना अनिवार्य असतानाही एनपीएस खाते उघडलेले नाही, अशांना 7 व्या वेतन आयोगाची थकबाकी देण्यात […]
विद्यार्थी व शिक्षकांचा उत्साह पाहून वेगळाच आनंद झाला – धनंजय मुंडे
बीड : कोविड कालावधीच्या मोठ्या ब्रेकनंतर प्रथमच परळी तालुक्यातील टोकवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत उपस्थित झालेल्या विद्यार्थ्यांना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी गुलाब पुष्प देत त्यांचे शाळेत स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या वर्गात जाऊन त्यांच्याशी संवाद साधत पालकमंत्री मुंडे यांनी ‘वेलकम बॅक टू स्कूल…’ म्हणताच विद्यार्थ्यांनी एका सुरात ‘थँक यू सर…’ म्हणत दिलेल्या प्रतिसादाने शाळेत चैतन्याचे वातावरण निर्माण […]
डिसले गुरुजींसारख्या शिक्षकांना सोबत घेऊन विद्यार्थ्यापर्यंत अव्वल दर्जाचे शिक्षण पोहोचवणार – मुख्यमंत्री
युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार रणजितसिंह डिसले यांना मिळाला. शिक्षण क्षेत्रातील जागतिक स्तरावरील सर्वोच्च पुरस्कार रणजितसिंह डिसले यांना मिळाला याबद्दल अभिमान असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. डिसले गुरुजींप्रमाणे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शिक्षण क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग राबविणाऱ्या राज्यातील शिक्षकांना सोबत घेऊन विद्यार्थ्यापर्यंत अव्वल दर्जाचे शिक्षण पोहोचविण्यासाठी […]
विद्यार्थी व शिक्षकांना ऑनलाईन शिक्षणातून दिवाळीची सुट्टी मिळणार – शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून दिवाळीची सुट्टी मिळणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात ऑनलाईन शिक्षण पद्धती अवलंब करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थी, शिक्षक व पालकही अध्ययन व अध्यापन प्रक्रियेत गुंतले आहेत. शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांना परंपरागत पद्धतीने मिळणारी सुट्टी या वर्षीही देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव […]





