अमेरिका : अमेरिकेच्या पेन्सिलव्हेनिया भागात महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. बर्फामुळे अंधुक वातावरण निर्माण झाल्याने समोरचं काहीही दिसू न शकल्यानं जवळपास ६० गाड्या एकमेकांवर आदळून हा अपघात झाला. या अपघातात 3 जणांचा मृत्यू तर २४ हून अधिक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी स्चुयलकिल काउंटीमध्ये महामार्गावर हा अपघात घडला. एकमेकांवर आदळलेल्या बऱ्याचशा गाड्यांचं […]

