मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांच्याविरोधात वांद्रे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणी चौकशीसाठी वांद्रे पोलिसांनी कंगना आणि रंगोलीला समन्स बजावले आहेत. कंगनाला 10 नोव्हेंबर रोजी तर, रंगोलीला 11 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी वांद्रे पोलीस ठाण्यात हजर रहायचे आहे. कंगनावर वादग्रस्त वक्तव्ये करुन समाजामध्ये तेढ […]

