पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात मंगळवारी एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना घडली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सुरू असलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामादरम्यान रोड रोलरखाली सापडून चार वर्षांच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने दौंड शहर हादरले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मृत मुलाचे नाव आर्यन जाधव असे असून ही घटना दौंड शहरातील […]
टॅग: pune accident news
कात्रज–कोंढवा रोडवर भीषण अपघात, वाहतूक कोंडीमुळे मदत मिळण्यास विलंब झाल्याने जेएसपीएमच्या शिक्षिकेचा दुर्दैवी मृत्यू
पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरातील इस्कॉन चौक येथे आज सकाळी साडेसातच्या सुमारास भीषण रस्ते अपघात घडला. या अपघातात जेएसपीएम संस्थेत शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या ५३ वर्षीय रमा कापडी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रमा कापडे या कात्रज–कोंढवा रोडवरून दुचाकीवरून जात असताना त्या चुकून विरुद्ध दिशेने गेल्या. याचवेळी समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांना […]
हिंजवडी आयटी पार्क हादरलं: भरधाव बस फुटपाथवर; बहीण–भावाचा जागीच मृत्यू, अनेक जखमी
हिंजवडी आयटी पार्क परिसरात पुन्हा एकदा बेफाम वेगाचा कहर पाहायला मिळाला. गर्दीच्या वेळी कंपनीची बस अचानक फुटपाथवर चढत दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर वाहतूक आणि रस्ते सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. हिंजवडी आयटी पार्कमधील वाढत्या अपघातांच्या मालिकेत सोमवारी आणखी एक भीषण घटना घडली. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पंचरत्न चौकाजवळ कंपनीच्या कर्मचाऱ्यांना नेणारी […]
नवले ब्रिज अपघात प्रकरण : कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याचे ठोस पुरावे नाहीत, आरटीओचा प्राथमिक अहवाल
पुणे : नवले पुल परिसरात झालेल्या कंटेनर ट्रक अपघाताबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) प्राथमिक निष्कर्ष जाहीर केले आहेत. आरटीओच्या मते, हा अपघात वाहन चालकाने कंटेनरवरील नियंत्रण गमावल्यानंतर झाल्याची शक्यता अधिक असून, ब्रेक फेल झाल्याचे कोणतेही ठोस पुरावे आढळलेले नाहीत. पुणे आरटीओच्या फ्लाइंग स्क्वॉडने गुरुवार आणि शुक्रवारी दोन दिवस तपासणी केली. या तपासात असे आढळले की अपघातानंतर […]
नवले ब्रिज परिसरातील अपघातातील मृतांचा आकडा वाढला, सात जणांचा मृत्यू, 15 ते 20 जण जखमी
पुणे : पुणे-बंगळुरू महामार्गावरील नवले ब्रिज परिसरात गुरुवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. दोन कंटेनर आणि एका कारचा झालेला हा अपघात इतका भीषण होता की, सात जणांचा जागीच मृत्यू झाला असून 15 ते 20 जण जखमी झाले आहेत. या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला. ब्रेक […]
‘गौतमी पाटीलच्या वक्तव्यांमध्ये कमालीची विसंगती’, रिक्षाचालक मरगळे यांच्या मुलीने घेतला चांगलाच समाचार
पुणे : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या वाहनाने झालेल्या अपघातानंतर आता या प्रकरणात नवा वाद उफाळला आहे. या अपघातात रिक्षाचालक मरगळे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर सध्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ते आयसीयूतून बाहेर आले असून तब्येत स्थिर असल्याचे समजते. मात्र, या अपघातानंतर गौतमी पाटील आणि मरगळे कुटुंब यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झाला […]
पुण्यातील नवले पुलावर पुन्हा एकदा भीषण अपघात, कंटेनरने धडक दिल्यामुळे 48 गाड्या एकमेकांवर आदळल्या
पुणे : पुण्यातील नवले पुलावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. आज रात्री नवले पुलावर भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. कंटेनरने धडक दिल्यामुळे 48 गाड्यांचे नुकसान झाले असल्याची माहिती पीएमआरडीए अग्निशमन दलाने दिली आहे. अग्निशमन दलाच्या 2 रेस्क्यू व्हॅन घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार नवले ब्रिजवर नर्हे नजीकच्या परिसरात हा […]






