ठाणे : ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा रेल्वे स्थानकावर रेल्वेची धडक बसल्याने 22 वर्षीय तरूणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ही घटना रेल्वेस्थानकावरील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. धुळे जिल्ह्यातील वडजाई गावचा रामेश्वर भरत देवरे (वय 22) हा तरूण सैन्य भरतीसाठी मुंबईत आला होता. या भरतीसाठी वडजाई आणि परिसरातून सुमारे 25 तरुण गेलेले आहेत. पोलिसांनी दिलेल्या […]

