हैदराबाद : आंतरधर्मीय विवाह केलेल्या २५ वर्षीय तरुणाची त्याच्या पत्नीच्या कुटुंबीयांनी कथितरित्या हत्या केली. बिल्लापुरम नागराज हे आपली पत्नी अश्रीन सुलतानासोबत बुधवारी रात्री मोटारसायकलवरून जात होते, त्यावेळी त्यांच्यावर सरूरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जीएचएमसी कार्यालयाजवळ चार-पाच जणांनी हल्ला केला. नागराज यांच्यावर हल्लेखोरांनी चाकूने वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, रंगारेड्डी जिल्ह्यातील मारपल्ली गावात राहणारा […]

