मुंबई : पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांना आदेश जारी केला आहे. त्यानुसार, जखमी अवस्थेत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्यांविषयी संवेदनशील दृष्टिकोन ठेवावा असे सांगितले आहे. आयुक्तांनी सर्व पोलिसांना निर्देश दिले आहेत की, जखमी व्यक्तीकडे प्रथम वैद्यकीय अहवाल (medical report) न मागता त्यांना लवकरात लवकर उपचार कसा मिळेल याला प्राधान्य द्यावे. […]
टॅग: Hemant Nagrale
मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची अखेर बदली
मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची अखेर बदली करण्यात आली आहे. परमबीर सिंग यांची गृहरक्षक दलामध्ये बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर हेमंत नगराळे यांची मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सचिन वाझे प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून परमबीर सिंग यांच्यावर टीका केली जात होती. अखेर आज राज्य सरकारने त्यांच्या बदलीचे आदेश दिले […]
वरिष्ठ आयपीएस अधिकारी हेमंत नगराळे यांची महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी वर्णी
मुंबई : वरिष्ठ आयपीएस अधिकारी हेमंत नगराळे यांची महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी वर्णी लागली आहे. सुबोधकुमार जैस्वाल यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) महासंचालकपदी प्रतिनियुक्ती झाल्यानंतर हे पद कोणाकडे जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर हेमंत नगराळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. हेमंत नगराळे हे 1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. संजय पांडे, हेमंत नगराळे, सुरेंद्र […]



