मुंबई : सध्या दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीप परिसरात चक्रिय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. तसेच पूर्व-मध्य अरबी समुद्रात द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आज उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने आज पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी […]
टॅग: heavy rainfall
राज्यात अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे १,८०० कोटींचे नुकसान, सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्राथमिक अंदाज
मुंबई : राज्यात नुकतीच झालेली अतिवृष्टी व त्यातून निर्माण झालेली पूरपरिस्थिती तसेच दरड कोसळण्याच्या घटनांमुळे रस्त्यांचे सुमारे 1 हजार 800 कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज सार्वजनिक बांधकाम विभागाने वर्तविला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना ही माहिती दिली. ते म्हणाले की, राज्याच्या सर्वच विभागांमध्ये अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनामुळे […]
अतिवृष्टी भागात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा तीन दिवस दौरा
मुंबई : महाराष्ट्रात पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने, अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले असून, बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. या शेतकर्याला दिलासा देण्यासाठी आणि झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे तीन दिवसांचा दौरा करणार आहेत. १९ ऑक्टोबर पासून दौऱ्याला सुरुवात होईल. आपल्या दौऱ्याची सुरुवात देवेंद्र […]



