पुणे : SWaCH सहकारी संस्थेशी संलग्न कचरा वेचक शालन लक्ष्मण वायले यांनी प्रामाणिकपणाचे एक प्रेरणादायी उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. कचरा वर्गीकरण करताना सापडलेली लग्नाची सोन्याची अंगठी त्यांनी कोणताही संकोच न करता मूळ मालकिणीला परत केली. २२ डिसेंबर २०२५ रोजी कसबा विश्रामबाग वाडा परिसरात घरोघरी कचरा संकलनाचे काम पूर्ण केल्यानंतर, गोळा केलेल्या कचऱ्याचे वर्गीकरण करत असताना […]

