पंढरपूर : पंढरपूर मधील बाजारपेठेमध्ये आज पहाटे चारच्या सुमारास भोसले चौकातील गणपती मंदिराच्या मागील बाजूस दुकानांना अचानक आग लागली. अनेक दुचाकी जाळून खाक झाल्या असून कपड्यांचे गोडावूनही आगीत जळून खाक झाले आहे. माजी नगराध्यक्ष नागेश भोसले यांनी आगीची माहिती मिळताच कार्यकर्त्यांच्या मदतीने व अग्निशामक दलाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळवले. मिळालेल्या माहिती नुसार, शहरातील […]

