सोलापूर : सोलापूर-विजापूर रोडवरील सोरेगाव येथे सोमवारी रात्री एक हृदयद्रावक घटना घडली. सात वर्षांचा ऋषी लक्ष्मण भरले या चिमुकल्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास घडली असून, परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऋषी शौचासाठी घराशेजारी असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ गेला होता. परंतु बराच वेळ झाला तरी तो घरी परतला […]
टॅग: electric shock
पुणे : खेळताना विजेच्या खांबाला स्पर्श, आठ वर्षांच्या मुलीचा करंट लागल्याने दुर्दैवी मृत्यू
पुणे : पुणे शहरातील नाना पेठ भागात रविवारी (१ जून) संध्याकाळी एक दुर्दैवी घटना घडली. ८ वर्षांच्या सायली डांबे या मुलीला रस्त्यावरील पथदिव्याच्या खांबावरून विजेचा करंट लागला. सायली ही डोके तालीम परिसरातील तिच्या घराजवळ खेळत असताना इनामदार चौकातील एका वीज खांबाला तिचा स्पर्श झाला, त्यामुळे लगेचच तिला करंट लागला. मिळालेल्या माहितीनुसार, सायलीसोबत खेळत असलेला आणखी […]
बांधकामावर पाणी मारताना विजेचा धक्का लागून २० वर्षीय तरुणाचा मृत्यू
नाशिक : बांधकामावर पाणी मारताना विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू झाला. मंगेश प्रवीण राणे (वय २०) असे मृत तरुणाचे नाव आहे. सातपूर भागात विद्युत तारा भूमिगत करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने ही दुःखद घटना घडली आहे. सात माऊली चौकात राहणारा मंगेश प्रवीण राणे रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घराचे बांधकाम चालू […]
भयंकर! विजेच्या खांबावर चढून काम करताना वीज प्रवाह सुरू झाला आणि अनर्थ घडला…
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील शहापूर इथे वीज वितरण कर्मचाऱ्याचा काम करताना विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी विजेच्या खांबावर चढून काम करीत असताना वीज प्रवाह सुरू झाल्याने हा अपघात घडला. वरिष्ठ तंत्रज्ञ असणारे ज्ञानेश्वर ताटे यांचे या दुर्दैवी घटनेत निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, हे काम करण्यासाठी फोन परमिट घेण्यात आले […]
हृदयद्रावक! खेळताना विजेचा धक्का बसल्याने ४ वर्षीय चिमुकल्याचा तडफडून मृत्यू
पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात अतिशय हृदयद्रावक घटना घडली आहे. येथील एका चार वर्षीय चिमुकल्यावर खेळता-खेळता काळाने घाला घातला आहे. रस्त्यावर खोदकाम करणारा ठेकेदार आणि महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे चिमुकल्याचा जीव गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहे. शहजाद अमीर सय्यद असे मृत चिमुकल्याचे नाव […]
विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी अंत, दोन जण गंभीर
मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील छतरपूरमध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांचा विजेचा धक्का लागल्यामुळे मृत्यू झाला आहे. या कुटुंबातील एक तरुण पाणी काढण्यासाठी पाण्याच्या टाकीमध्ये उतरला होता, त्यावेळी त्याला करंट बसल्याचे घरातील लोकांनी पाहिले. मात्र, ऐनवेळी मागचा-पुढचा विचार न करता त्यांनी त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली. तरुणाला वाचविण्याच्या प्रयत्नात या तरूणासह कुटुंबातील सहा सदस्यांचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी […]






