नवी दिल्ली : उपसभापतींच्या वतीने शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना नोटीस बजावण्यात आली होती. या नोटीसनुसार बंडखोर आमदारांना आज 27 जून रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत उत्तर दाखल करण्यास सांगितले होते. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे गटाला मोठा दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने बंडखोर आमदारांना उपसभापतींनी बजावलेल्या अपात्रतेच्या नोटीसला ११ जुलै संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत उत्तर दाखल करण्याची मुभा दिली […]

