नवी मुंबई : कांदळवन संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने शासकीय यंत्रणांनी समन्वय ठेवून पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी प्रयत्न करावे. अशा सूचना कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांनी दिल्या. कोकण विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात कांदळवन संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस अप्पर प्रधान वनसंरक्षक(कांदळवन) एस. व्ही. रामराव उपस्थित होते. […]

