जगभरात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. दरम्यान कोरोना विषाणू आणि त्याच्या संसर्गामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. दरम्यान, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांबाबत एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. चीनमधील वुहानमध्ये कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची फुप्फुसे खराब झाल्याचे संशोधनातून समोर आले आहे. त्याबरोबरच कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांपैकी ५ टक्के रुग्ण पुन्हा संसर्ग होऊन रुग्णालयात भरती झाले […]
टॅग: corona
नवनीत राणा यांच्या कुटुंबातील तब्बल 7 जणांना कोरोनाची लागण
खासदार नवनीत राणा यांच्या घरात कोरोनाने शिरकाव केला आहे. नवनीत राणा यांच्या सासु-सासऱ्यांसह कुटुंबातील तब्बल 7 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. नवनीत राणा यांच्या घरात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल देखील पॉझिटिव्ह आाला आहे. नवनीत राणा यांच्या सासु-सासऱ्यांना कोरोनाची लक्षणं दिसत होती. कोरोनाची चाचणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान,रवी राणा आणि […]
२४ तासात भाजपच्या ५ नेत्यांना कोरोनाची लागण
करोनाने देशभरात थैमान घातलेलं असतानाच अनेक राजकीय नेत्यांनाही करोनाची लागण झाली आहे. करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अद्यापही प्रयत्न सुरु आहेत. मागील २४ तासांत भाजपाच्या पाच नेत्यांना करोनाची लागण झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना रविवारी करोनाची लागण झाल्याचं समोर आलं. करोनाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने चाचणी केली असता आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं अमित शाह यांनी […]
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली आहे. अमित शहा यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. अमित शहा एम्स रुग्णालयात दाखल झाले आहेत.कोरोनाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने आपण चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती ठीक आहे, पण डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आपण रुग्णालयात दाखल होत आहोत, असं ट्विट अमित शहांनी […]
उत्तर प्रदेश कॅबिनेट मंत्री कमल वरूण यांचा करोनामुळे आज मृत्यू
उत्तर प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेल्या कमल वरूण यांचा करोनामुळे आज मृत्यू झाला आहे. त्यांचे संपूर्ण नाव कमल राणी वरूण असं आहे. कमल वरूण या उत्तर प्रदेश विधानसभेच्या सदस्य होत्या. याअगोदर त्या खासदारही होत्या. सध्या त्या उत्तर प्रदेश सरकारमध्ये तंत्रशिक्षण मंत्री होत्या. १८ जुलै रोजी त्यांचे नमूने तपासण्यात आले होते, जे करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले […]
पुणे महापालिकेला अर्थसहाय्य करण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडून ठोस आश्वासन नाही
गेल्या चार महिन्यांत पुणे महापालिकेने ३०० कोटी रुपयांपर्यंत निधी खर्च के ला आहे. आता महापालिकेची आर्थिक मर्यादा पाहता राज्य सरकारने आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणेच नव्हे, तर राज्यातील सर्वच महापालिकांची आर्थिक स्थिती गंभीर असून महापालिका राज्य सरकारकडे आणि आम्ही केंद्राकडे निधीची मागणी करत आहोत, असे सांगत कोणतेही ठोस […]
गेल्या 24 तासांत सर्वाधिक 52 हजार 123 नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद
कोरोनाचं थैमान सुरु असून दररोज सरासरी 40 ते 50 हजारांदरम्यान नवे रूग्ण वाढत आहेत. मात्र आता ही सरासरी वाढलेली दिसून येत आहे. मृत्यूंचं प्रमाण देखील वाढलं आहे. काल दिवसभरात 52 हजार 123 नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे. भारतातली कोरोनाबाधितांची एकूण संख्या आतापर्यंत 15 लाख 83 हजार 792 इतकी झाली आहे. तर गेल्या 24 तासांत […]
आता तीन पेक्षा अधिक करोना रुग्ण आढळून आल्यानंतरच पूर्ण इमारत सील केली जाणार
मुंबई महापालिकेनं करोना रुग्ण आढळून येणाऱ्या बिल्डिंग सील करण्याच्या नियमात बदल केला आहे. “एका बिल्डिंगमध्ये जर तीन किंवा त्यापेक्षा जास्त करोना रुग्ण आढळून आले, तर महापालिका प्रशासनाकडून संपूर्ण बिल्डिंग सील केली जाईल. तीन पेक्षा कमी रुग्ण असतील, तर महापालिका अधिकाऱ्यांकडून संबंधित मजला सील केला जाईल. बिल्डिंगमधील इतर रहिवाशांवर बाहेर ये-जा करण्यावर कसलीही बंधन असणार नाही,” […]
डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ’ब्रायन यांना करोनाची लागण
अमेरिकेत कोरोनाचं थैमान असतानाच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराला करोनाची लागण झाली आहे. सीएनएनने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ’ब्रायन यांना करोनाची लागण झाली असल्याचं वृत्त दिलं. पहिल्यांदाच ट्रम्प प्रशासनातील उच्च दर्जाच्या अधिकाऱ्याला करोनाची लागण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि रॉबर्ट ओ’ब्रायन यांच्यात शेवटची भेट कधी झाली होती हे अद्याप स्पष्ट नाही. १० जुलैला […]
देशातले शास्त्रज्ञ करोनाविरोधी लस शोधण्यासाठी वेगाने काम करत आहेत-पंतप्रधान मोदी
आपल्या देशातले शास्त्रज्ञ करोनावर लस शोधण्यासाठी रात्रंदिवस कार्यरत आहेत असं मोदींनी म्हटलं आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातल्या मुंबई, दिल्ली आणि कोलकाता येथील हायटेक लॅबचे उद्घाटन केले. त्यानंतर ते बोलत होते. सुरुवातीला आपल्या देशात करोनाच्या चाचण्या करण्यासाठी एकच लॅब होती. आता संपूर्ण देशात १३०० लॅब्स आहेत. तर देशभरात पाच लाख टेस्ट रोज होत […]










