नवी दिल्ली : भारतात कोरोनाचा धोका सातत्याने वाढत असल्याचे दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशात १३ हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. एका दिवसात एकूण 13,216 प्रकरणे समोर आली आहेत. तर 23 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. नवीन आकडेवारीनंतर देशात सक्रिय रुग्णांची संख्या 68 हजारांच्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन आकडेवारीनुसार, गेल्या 24 […]
टॅग: corona patients
चीनमध्ये कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ, अनेक शहरांना रेड अलर्ट
चीन : चीनच्या ज्या शहरात कोरोना विषाणू पहिल्यांदा आढळून आला होता, त्या वुहान शहरात कोरोना पुन्हा एकदा जोर धरताना दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत वुहानमध्ये कोरोनाचे ५२६ रुग्ण आढळून आलेत. गेल्या दोन वर्षांतील एका दिवसाच्या संक्रमणाचा हा सर्वात मोठा आकडा आहे. २४ तासांत कोरोनाच्या ५०० हून अधिक रुग्णांची नोंद झाल्यानं चीनच्या ‘कोव्हिड झिरो धोरणा’ला […]
ब्रेकिंग! दिल्लीत मागील 24 तासांत कोरोनाचे 5481 नवीन रुग्ण, 3 जणांचा मृत्यू
नवी दिल्ली : नवी दिल्लीत मागील 24 तासांत कोरोनाचे 5481 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे येथे संसर्गाचे प्रमाण आता ८.३७ टक्क्यांवर पोहोचले आहे. या विषाणूमुळे 3 मृत्यू झाले आहेत. तर 1575 रुग्ण बरे झाले आहेत. 531 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. २९ डिसेंबर रोजी दिल्लीत कोरोनाचे ९२३ रुग्ण आढळले. त्यानंतर 30 डिसेंबरला 1313, तर 31 डिसेंबरला […]
राज्यात ‘या’ १५ जिल्ह्यांमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत घट, आरोग्यमंत्र्यांनी दिली कोरोना उपाययोजनांची सविस्तर माहिती
मुंबई : राज्यातील सुमारे १५ जिल्ह्यांमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या कमी होत आहे, तर अन्य काही जिल्ह्यांमध्ये त्यात वाढही होत आहे. लसीकरणाला वेग देण्यासाठी लसींचा पुरवठा आवश्यक असून आज राज्यात कोविशिल्डचे ९ लाख डोस प्राप्त झाले आहेत. त्याद्वारे ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण केले जाईल. तर १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणासाठी सुमारे १८ लाख डोसेससाठी खरेदी आदेश […]
कोरोनाचा विस्फोट!, एकाच रूग्णालयातील ३८४ डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफला कोरोना पॉझिटिव्ह
पाटणा : पाटणा एम्स रुग्णालयातील 384 डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह झालाय, असं पाटणा एम्सचे वैद्यकीय अधीक्षकांनी सांगितलं आहे. पाटणा एम्सचे वैद्यकीय अधीक्षक म्हणाले की, रुग्णालयातील 384 डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह झालाय. बिहारमधील पंचायत निवडणुका कोरोनाच्या वाढत्या प्रकरणात पुढे ढकलण्यात आल्यात. निवडणुकीसंदर्भात अधिसूचना एप्रिल अखेर जारी करण्यात येणार होती, पण […]
कोरोनाचा उद्रेक! २४ तासांत २ लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची भर
नवी दिल्ली : कोरोना संक्रमणानं देशात अगदी भयावह परिस्थिती निर्माण केली आहे. भारतात कोरोना संक्रमणाचे आकडे दररोज नवा उच्चांक गाठत आहेत. बुधवारी भारतात पहिल्यांदाच दोन लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. बुधवारी २४ तासांत एकूण २ लाख ७३९ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर १०३८ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील […]
पुणे महापालिकेचा मोठा निर्णय, खासगी हॉस्पिटलमधील ८० टक्के बेड कोरोना रुग्णांसाठी राखीव..
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून पुण्यातील रुग्णालयांमध्ये आता बेड्सची कमतरता जाणवू लागली आहे. ही कमतरता दूर करण्यासाठी पुणे महापालिकेने महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता खासगी रुग्णालयात तब्बल ८० टक्के बेड्स कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत ही महत्वाची […]
महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ, ‘या’ शहरांमध्ये कडक निर्बंध
महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्यामुळे काही जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला तर काही ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले. तरीदेखील रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने चिंता वाढली आहे. राज्यात गेल्या दोन दिवसात 20 हजारांच्या आसपास रुग्ण आढळले आहेत. सध्या राज्यात 97 हजार 638 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर राज्यातील मृत्यूदर हा 2.36 टक्क्यांवर पोहोचला आहे. […]
दिलासादायक : देशात कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने घट
देशात कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये सातत्याने घट होत आहे. तसेच कोरोनामधून बरे होणार्या रुग्णांची संख्याही सतत वाढत आहे. देशात गेल्या २४ तासात कोरोनाचे ५५,७२२ नवे रुग्ण आढळून आले आहेत तर देशात ५७९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आता ७ लाख ७२ हजार ५५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, […]








